पुणे–पिंपरीत राष्ट्रवादी एकत्र; घड्याळ-तुतारीकडून निवडणूक लढवण्याची रोहित पवारांची घोषणा

पुणे–पिंपरीत राष्ट्रवादी एकत्र; घड्याळ-तुतारीकडून निवडणूक लढवण्याची रोहित पवारांची घोषणा

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि निवडणूक चिन्हांबाबत मतभेद झाल्याने चर्चांना उधाण आलेले दिसून येत.  त्यानंतर गेल्या दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी हे महाविकास आघाडीच्या बैठकीला हजेरी लावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीतून राष्ट्रवादी (शरद पवार) उपस्थित नव्हते. अखेर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे आणि पिंपरी दोन्हीकडे एकत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे.

रोहित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांसोबत विचारविनिमय करून, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार आपल्याला घड्याळासोबत पुढे जाणे योग्य राहील. आम्ही तुतारीकडून निवडणूक लढवणार आहोत. दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही गटांकडून आता अधिकृतपणे एकत्र निवडणूक लढवणार आहेत.उद्या तुतारी आणि घड्याळकडून अर्ज वाटप केले जाणार असून, त्यातून कोणाला किती जागा मिळणार आहेत हे स्पष्ट होणार आहे. हे देखील कळणार आहे. कार्यकर्त्यांची इच्छा बघून हा निर्णय आम्ही अखेर घेतला आहे. पुणे महापालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांनी काही केलं नाही. आता पिंपरीची जबाबदारी अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर माझ्याकडे पुण्याची जबाबदारी आहे.