काँग्रेस मुलाखतीचे हे सत्र आजही (गुरूवारी) सुरूच राहणार आहे.

  काँग्रेस मुलाखतीचे हे सत्र आजही (गुरूवारी) सुरूच राहणार आहे.

                              

पुणे:- पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून बुधवारी दिवसभरात १ ते २० प्रभागांमधील २३० इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहे.  राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांत निवडणुकीच्या हालचालींमध्ये वेग दिसून येत आहे.  काँग्रेस पक्षाकडून बुधवारी काँग्रेस भवन इथे इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सुरू करण्यात आले. महापालिका निवडणूक समन्वय समितीचा अध्यक्ष माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार व प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड, दीप्ती चौधरी, कमल व्यावहारे आदींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
                                                         पहिल्या दिवशी १ ते २० प्रभागातील सुमारे २३० इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणेबाजी करत इच्छुक उमेदवार काँग्रेस भवनात दाखल झाले. यातील अनेकजण काँग्रेस पदाधिकारी  असलेल्यांचे नातेवाईक व  लोकप्रतिनिधी होते. आम्ही निष्ठावंत आहोत आम्हाला संधी मिळाली तर नक्कीच विजय मिळवून देऊ असे ते आश्वासन करत होते. तर काही आपल्या केलेल्या कार्याचे अहवाल, प्रसिद्धीपत्रके नेत्यांकडे सोपवत उमेदवारीसाठी संधी मागत होते. मुलाखतीचे हे सत्र आजही (गुरूवारी) सुरूच राहणार आहे. मुलाखत समिती पुढील काही दिवसांत उर्वरित प्रभागांसाठी इच्छुकांची यादी अंतिम करणार असून अंतिम तिकीट वाटपासाठी उच्चस्तरावर चर्चा सुरू राहणार आहे.