पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेल्यांना संधी मिळावी, भाजप निष्ठावंतांची मागणी.

पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेल्यांना संधी मिळावी, भाजप निष्ठावंतांची मागणी.

       

पुणे:-  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यामध्ये अन्य पक्षांमधील अनेकांनी भाजपाचा उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्या आहे. परंतु विजयाची खात्री असलेल्या ठिकाणी मूळ भाजपच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळावी ह्याच्यावर जोर केला जात आहे. 
                                                           यादरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणात २ हजार ५०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज करून मुलाखती दिल्या आहे. त्यामुळे भाजपकडे इच्छुकांची संख्या अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटातील ५ नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. अन्य पक्षांतील माजी नगरसेवक भाजप प्रवेशासाठी 'वेटींग'वर आहेत. ह्या वाढत्या अर्जांमुळे पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलेल्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

                                          याशिवाय आगामी भांडारणी, पायाभूत विकासकामे, नागरी सुविधा व स्थानिक प्रश्न यावर प्राधान्याने लक्ष केंद्रित करणारे उमेदवार निवडण्याचा प्रयत्न पक्ष करणार असल्याचे पक्षस्रोतांकडून समजते. पक्षाने यावेळी युवा आणि महिलांच्या संख्येतही वाढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे.